पारोळा प्रतिनिधी । कोरोना विषाणू आजारा बाबत खबरदारीचे उपाय योजना म्हणून तालुक्याचे ग्रामदैवत श्री बालाजी मंदिर २० मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद निर्णय बालाजी मंदिर विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
श्री बालाजी मंदीरात सकाळी आणि सायंकाळी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. ही गर्दी होऊ नये ते टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसेच बालाजी संस्थानतर्फे चालत असलेले अन्न छत्रालय हे देखील २१ मार्च ते ३१ मार्च पर्यन्त बंद राहणार आहे. तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आहवान बालाजी संस्थांनाच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.