पारोळा तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा 

 

पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रियेचा अंतिम निकाल आज पार पडला. या ९ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर मतदान प्रक्रिया पार पडली.

यात मेहू, धुळपिंप्री, सावखेडा होळ, सावखेडे मराठ, सावखेडे तुर्क, कन्हेरे, कराडी, कंकराज व राजवड या गावांचा समावेश होता. यात आमदार चिमणराव पाटील यांनी गावातील जातीय सलोखा, गावाचा विकास व गावातील एकता कायम राहावी या दृष्टीने सर्वच ग्रामपंचायतींना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. यात कराडी, सावखेडे होळ व सावखेडे मराठ या ग्रामपंचायतींनी आपली निवडणूक बिनविरोध केली तर मेहू गावात जाहीर पाठींबा दर्शवत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.

पारोळा तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या हाती लागलेल्या निकालात आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

यात कराडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच पूनम मनोहर पाटील यांचेसह ७ सदस्य, सावखेडे मराठ ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच गोपाल सुरेश पाटील यांचेसह ६ सदस्य व सावखेडे होळ ग्रामपंचायतीवर हरसिंग नाना पाटील पुरस्कृत लोकनियुक्त सरपंच राजू मंगा ठाकरे, उपसरपंच सुरेखा रामचंद्र पाटील यांचेसह ७ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर मेहू ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांचेसह ७ सदस्य, सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीबाई दिलीप रामोशी यांचेसह ३ सदस्य, कंकराज ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच आशाबाई राजाराम पाटील यांचेसह ३ सदस्य व कन्हेरे ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच अनिता सुकदेव भिल यांचेसह ७ सदस्यांनी विजय संपादन केला.

या निवडणूक प्रक्रियेत एकूण ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वर्चस्व सिध्द झाल्याचे स्पष्ट झाले असून आमदार चिमणराव पाटील हे नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनाला असतांना त्यांनी सर्व बिनविरोध व विजयी उमेदवारांना दूरध्वनी द्वारे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या तर पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी या उमेदवारांचा सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या. तसेच आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या माध्यमाने गावातील विकासाला अधिक चालना देऊ व गावातील मुलभूत सुविधेसह इतर विकासकामांना लवकरच प्राधान्याने पूर्ण करू असे आश्वासन अमोल पाटील यांनी नवनिर्वाचित उमेदवारांना यावेळी दिले.

यावेळी मंगरूळ सरपंच मुन्ना पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, गणेश मोरे, विजय निकम, शेतकी संघाचे व्हा.चेअरमन नाना पाटील, मेहू येथील हिम्मत सुपडू पाटील, राजेंद्र लोटन पाटील, आनंदा पुंडलिक पाटील, जगदीश हरी पाटील, मा.लोकनियुक्त सरपंच विकास जगन्नाथ बोरसे, सुरेश मन्साराम पाटील, अनिल अर्जुन पाटील, सीमा विकास पाटील, प्रमिलाबाई मधुकर पाटील, कमल भानुदास पाटील, बारकू रतन पाटील, मनीषा सुधाकर पाटील, भगवान पुंडलिक पाटील, राहुल विश्वास पाटील, भूषण मधुकर पाटील, अनिल पाटील, अतुल पाटील, राजीव पंडित पाटील, सागर पाटील, भाऊसाहेब पाटील, गुलाब पाटील, संजय पाटील, शुभम पाटील, सुधाकर पाटील, विजय पाटील, डॉ.किरण पाटील, बंटी पाटील, भावेश पाटील, हनुमंतखेडे येथील सागर पाटील, निलेश पाटील, भरत पाटील, स्वप्नील पाटील, जयेश पाटील, हर्शल राहुल पाटील, संभाजी पाटील, महारू किशोर पाटील, विठ्ठल पाटील, रावसाहेब पाटील, राहुल बोरसे, विश्वास सुपडू पाटील, संजय सुपडू पाटील, गणेश सुपडू पाटील, संभाजी सुपडू पाटील, अतुल संजय पाटील, भगवान बन्सीलाल पाटील, कंकराज येथील मनीषा प्रेमानंद पाटील, रेखा विश्वास पाटील, दिलीप रामभाऊ पाटील, राजाराम आप्पा पाटील, प्रेमानंद भटा पाटील, तुकाराम आप्पा पाटील, दिगंबर नारायण पाटील, विश्वास श्रीराम पाटील, वसंत नानाभाऊ पाटील, रामचंद्र दामू पाटील, संजय गंगाराम पाटील, मगन सुपडू पाटील, शालिक विक्रम पाटील, सुनील धनराज पाटील, संजू तानकू भिल, अरुण गंगाराम पाटील, हमीद पिंजारी, साहेबराव पिंजारी, विशाल जगन्नाथ पाटील, ललित रमेश पाटील, निलेश तुकाराम पाटील, समाधान पाटील, सावखेडे तुर्क येथील पल्लवी भारत लोणारी, नबाबाई महादू पाटील, महेश संजय पवार, हिरामण धनराज पाटील, सागर प्रल्हाद पाटील, नितीन लालसिंग पाटील, किरण भास्कर पाटील, पप्पू बापू पाटील, दीपक पाटील, समाधान पाटील, महेंद्र पाटील, किरण नाना पाटील, कन्हेरे येथील संगीता साहेबराव भिल रंजनाबाई मुरलीधर पाटील, पांडुरंग पितांबर पाटील, भिला बाबूलाल पाटील, प्रतिभाबाई संतोष पाटील, रत्नाबाई पिरण पाटील, संगीता शिवाजी पाटील, गोविंदराव पुना पाटील, मुरलीधर देवचंद पाटील, कैलास भीमराव पाटील, अमबरसिंग शंकर पाटील, तुकाराम भगवान पाटील, एकनाथ विठ्ठल पाटील यांचेसह आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content