पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पारोळा आणि एरंडोल तालुक्याच्या मतदार संघांसाठी १०० कोटी ५१ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. आ.चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने हा निधी मिळाला आहे.
राज्य शासनाने मंजूर केलेल्या निधीतून मुख्य रस्ते, गावांना जोडणारे पूल, गावांत काँक्रीटीकरण, प्रशासकीय इमारती या गोष्टींचा समावेश आहे. यात प्रामुख्याने पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र.ऊ. ते पिंप्री प्र.ऊ. या दोन्ही गावांना जोडणारा पुलाच्या कामासाठी १२ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पावसाळ्यात व दैनंदिन नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांवर पूर्णविराम लागणार आहे. पावसाळ्यात या दोनही गावांचा संपर्क तुटत होता. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, दळणवळण या प्रमुख समस्यांना नागरिकांना गेल्या कित्तेक दशकापासून तोंड द्यावे लागत होते. तर आता या पुलाच्या कामाला देखील मंजुरी मिळाली आहे. या सर्वच कामांसाठी आमदार चिमणराव पाटील हे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांना अखेर यश संपादन झाले आहे.
या कामांचा आहे समावेश
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील रस्ते –
पारोळा तालुका रस्ते – १) तामसवाडी गावांत रस्ता काँक्रीटीकरण व सुधारणा करणेसाठी – २ कोटी, २) बोळे ते तालुकाहद्द पर्यंत रस्त्याची सुधारणा करणेसाठी – ३ कोटी, ३) कजगांव रस्ता हॉटेल नाईटकिंग पासून ते पुढे ३०० मीटर रस्ता काँक्रीटीकरण करणेसाठी – ३ कोटी, ४) हनुमंतखेडा ते शिरसमणी रस्त्याच्या सुधारणेसाठी – ३ कोटी, ५) मोंढाळे प्र.ऊ. ते पारोळा रस्त्याची सुधारणा करणेसाठी – ३.३० कोटी, ६) करंजी ते बोळे रस्ता सुधारणा करणेसाठी – ३ कोटी, ७) उंदीरखेडा-उडणी दिगर ते जोगलखेडा रस्ता सुधारणा करणेसाठी – ३ कोटी, ८) टोळी ते बोळे रस्ताची सुधारणा करणेसाठी -१ कोटी, ९) देवगांव ते मुंदाणे प्र.ऊ. रस्त्याची सुधारणा करणेसाठी – १ कोटी, १०) नागेश्वर फाट्यापासून ते पिंप्री प्र.ऊ. गावापर्यंत रस्ता सुधारणेसाठी -१.२५ कोटी, ११) मुंदाणे प्र.अ. ते नागेश्वर रस्त्याचा सुधारणेसाठी – ९०.०० लक्ष, १२) मंगरूळ ते नगांव रस्ता सुधारणेसाठी – १ कोटी, १३) शिरसमणी ते आडगांव रस्ता सुधारणेसाठी – ०.९० लक्ष
पारोळा तालुक्यातील पुलांची कामे – १) पिंप्री प्र.ऊ. ते मोंढाळे प्र.ऊ. दरम्यान बोरी नदीवर पुलाच्या बांधकामासाठी – १२ कोटी, २) कराडी ते बोळे रस्त्यावर लहान पुलाच्या बांधकामासाठी – २.५० कोटी, ३) आडगांव ते आडगांव तांडा (गडगांव) दरम्यान फरशीपुलाच्या बांधकामासाठी – १.२५ कोटी
एरंडोल तालुका रस्ते – १) खेडी ते रवंजा बु रस्त्याचा सुधारणेसाठी – ६.५० कोटी, २) कासोदा ते अंतुर्ली रस्त्याचा सुधारणेसाठी – २.८० कोटी, ३) धुळपिंप्री गावांत गटार, पाईप मोरी, काँक्रीटीकरण करणे व कासोदा ते अंतुर्ली रस्त्यावर पाईप मोरी बांधणेसाठी – १.२० कोटी, ४) हनुमंतखेडा मजरे ते नानखुर्द गावापर्यंत रस्त्याचा सुधारणेसाठी – ३ कोटी, ५) तळई ते भातखंडे रस्त्याचा सुधारणेसाठी – ३.५० कोटी, ६) एरंडोल शहरात कासोदा रस्त्यापासून ते म्हसावद रस्त्यापर्यंत रस्त्याचा सुधारणेसाठी – ६०.०० लक्ष, ७) एरंडोल शहरात डी.डी.एस.पी कॉलेजपासून ते राष्ट्रीय महामार्ग क्र.६ पर्यंत रस्त्याचा सुधारणेसाठी – ७०.०० लक्ष, ८) एरंडोल शहरात डी.डी. एस. पी. कॉलेजपासून ते महाजन नगर पर्यंत रस्त्याचा सुधारणेसाठी – ४०.०० लक्ष, ९) बाम्हणे ते तळई रस्त्यावर संरक्षण भिंतीसह रस्ता सुधारणेसाठी – १.०० कोटी, १०) रवंजा खु ते लमांजन रस्त्याचा सुधारणेसाठी – १.५० कोटी, ११) दापोरी ते लमांजन रस्त्याचा सुधारणेसाठी – १.५० कोटी, १२) कासोदा ते कनाशी रस्त्याचा सुधारणेसाठी – ६०.०० लक्ष
एरंडोल तालुक्यातील इमारती – १) एरंडोल शहरातील तहसिल कार्यालय इमारतीच्या बांधकामासाठी – १२.३५ कोटी, २) एरंडोल शहरातील उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांचे कार्यालय इमारतीचा बांधकामासाठी – ४.८६ कोटी, ३) एरंडोल शहरात तहसिलदार यांचे करिता निवासस्थान इमारतीच्या बांधकामासाठी – ७०.०० लक्ष, ४) एरंडोल शहरात उपविभागीय अधिकारी (प्रांत) यांचे करिता निवासस्थान इमारतीच्या बांधकामासाठी – ७०.०० लक्ष
भडगांव तालुका गिरड –आमडदे गटातील रस्ते – १) आमडदे ते वरखेड रस्ता सुधारणेसाठी – २.५० कोटी, २) भडगांव ते आमडदे रस्ता सुधारणेसाठी – १.५० कोटी, ३) भातखंडे ते गिरड रस्ता सुधारणेसाठी – २.५० कोटी, ४) पिंपळगांव ते भडगांव रोड रस्ता सुधारणेसाठी – २.५० कोटी, ५) लोण ते बांबरूड रस्ता सुधारणेसाठी – २ कोटी, ६) भडगांव रोड ते मांडकी रस्ता सुधारणेसाठी – १ कोटी, ७) वरखेड ते पिंपळगांव रस्ता सुधारणेसाठी – १.५० कोटी, ८) भातखंडे ते तळई रस्ता सुधारणेसाठी – १.५० कोटी, ९) अंतुर्ली ते तळई रस्ता सुधारणेसाठी – १.५० कोटी
अशा एकूण पारोळा, एरंडोल व भडगांव तालुक्यासाठी तब्बल १००.५१ कोटी रुपयांचा निधी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघाला मिळाला आहे. यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत.
तसेच या कामांमुळे ज्या-ज्या स्थानिक गावांचा रहदारी व दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्या गावांच्या वतीने आमदार चिमणराव पाटील यांचे आभार मानले जात आहे. तसेच मोंढाळे प्र.ऊ. ते पिंप्री प्र.ऊ. या गावांना जोडणाऱ्या पुलाचा मंजुरीमुळे ग्रामस्थांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.