पारधी वाड्यात अवैधरीत्या होणारी दारू विक्री बंद करा : पारधी मंडळाची मागणी

धरणगाव, प्रतिनिधी | पारधी वाडा भागात अवैधरीत्या दारू विक्री केली जात असून ती त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी आदिवासी पारधी समाज बहुउद्देशीय विकास मंडळातर्फे अशी धरणगाव पोलीस निरीक्षक यांच्याकडे स्मरणपत्राद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  पारधी वाडा येथील जय पारधी, रीना भागवत पारधी, संजय काशिनाथ पारधी हे अवैधरीत्या पारधी वाड्यात दारू विक्री करीत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी अवैध धंदे बंद करण्याबाबत सांगितले असता त्यांना या तिघांकडून शिवीगाळ केली जात आहे. तसेच पोलीस आमच्या खिशात ते आमचे काहीही वाकडे करू शकत नसल्याचा दम भारतात. दरम्यान, गुरुवार ३० ऑगस्ट रोजी पारधी समाजातील नागरिक त्यांना समजविण्यासाठी जय व भगवान यांनी स्त्रियांना उद्धटपणे बोलत पोलीस आमचे धंदे बंद करू शकत नसल्याचे यावेळी सांगितले.  ग्रामस्थ पारधी वाड्यात दारू पिण्यासाठी येत असतात. हे दारू पिण्यासाठी आलेले लोक रात्री-बेरात्री वाड्यातील मुली व महिलांना त्रास देत असतात.  यास सर्वस्वी जय पारधी, संजय पारधी, भगवान पारधी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या त्रासाबद्दल  पोलीस निरीक्षक   शंकर शेळके यांनी दारू बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते अजूनही दारू विक्री करत असल्याने ही अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशी मागणी शुक्रवार १ ऑक्टोबर रोजी पुन्हा पोलीस निरीक्षकांना स्मरणपत्राद्वारे करण्यात आली आहे. या स्मरणपत्रावर गिन्यानबाई पारधी, रत्नाबाई पारधी आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content