पाय घसरून विहिरीत पडल्याने मजूराचा दुदैवी मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल गावात विहीरीच्या कामासाठी गेलेल्या एका मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवाशी भिमराव अंकात कोळी (वय-५०) हे रविवारी ५ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास गावातील मुंजोबा गेट जवळ असलेल्या गावाच्या ग्रामपंचायत विहीरीवर गोद कामासाठी गेले होते.  विहीरीत खाली उतरत असतांना पाय घसरल्याने विहीरीत खाली पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते विहीरीतच जागीच मृत्यू झाली. याबाबत मयताचा पुतण्या लखन दिनकर कोळी (वय-३०) यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Protected Content