जळगाव प्रतिनिधी । पायी जात असलेल्या ३४ वर्षीय तरूणाचा चक्कर येवून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना भजेगल्ली रोडवर आज सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विनायक सुरेश वाणी (वय-३४) रा. बालाजी पेठ हा तरूणी आज ४ मार्च रोजी साकळी ११.३० वाजेच्या सुमारास नविन बसस्थानकाजवळील भजेगल्लीतून पायी जात असतांना अचानक चक्कर येवून रोडवर पडला. तरूण खालीपडल्याचे पाहून परिसरातील नागरीकांनी तातडीने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालत हलविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलींद बारी यांनी तपासणी केली असता मयत घोषीत केले. डॉ. बारी यांच्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.