यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराराध योजना व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी अनेक प्रकरण दाखल झाली आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने ही प्रकरणे धूळ खात पडून असून ती लवकरात लवकर मंजूर करण्यात यावीत अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाततर्फे तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
निवेदनात आशय असा की , तहसील कार्यालयात मागील काही दिवसांपासून संजय गांधी निराधार , श्रावणबाळ वृद्धपकाळ योजना, इंदीरा गांधी योजना , राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे ही प्रलंबीत आहेत. ही सर्व प्रकरण पंधरा दिवसाच्या आत मंजूर करून निकाली करण्यात यावी. मागील दिड वर्षापासून राज्यात कोरोना संसर्गाने सर्वत्र थैमान घातले आहे. सर्वसामान्य माणुस हा आर्थीक संकटात आला आहे. तहसील कार्यालयात विविध योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अनेकांनी आपले अर्ज दिले आहेत. मात्र, योजनांचा लाभ मिळविण्यासाठी निराधार, विधवा, अपंग या लोकांना वारंवार कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. यात कार्यालयीन कामकाजात दिरंगाई होत असल्याने पात्र लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असून लवकरात लवकर ही सर्व प्रकरणे निकाली काढण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. . निवेदनावर तुकाराम रघुनाथ बारी, राहुल कचरे, नितिन बारी, आसीम खान, जयेश चोपडे, दिलीप वाणी, राजु शेख, सागर चौधरी, मनोज करणकर, आयुष वाणी, गणेश कोलते, सोनु कोळी , सचिन चौधरी, नरेन्द्र माळी, राहुल पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.