पातोंडा परिसर विकास संस्थेला राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार जाहीर

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी |  येथील पातोंडा परिसर विकास संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2018-19 अंतर्गत विभागस्तरावर सेवाभावी संस्थेच्या गटात द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे.  पुढील महिन्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

शासन निर्णय महसूल व वनविभागाच्या वतीने दि. १७ रोजी पातोंडा परिसर विकास संस्थेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला करण्यात आला आहे.  डिसेंबर  महिन्याच्या १०  तारखेला विभाग स्तरावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत  पुरस्कार प्रदान कण्यात येणार आहे. या  पुरस्काराचे स्वरूप राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रुपये पंचाहत्तर हजार रुपयांचा धनादेश संस्थेला प्राप्त होणार आहे. या पुरस्काराचे पातोंडा ग्रामस्थांकडून व पंचक्रोशीतून संस्थेचे व वृक्ष चळवळीसाठी झटलेल्या वृक्षप्रेमींचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. पातोंडा परिसर विकास संस्था ही देखील गेल्या चार ते पाच वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनात मोठी भूमिका बजावत असून आजपर्यंत हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करून त्यांचे यशस्वीरित्या संवर्धन केलेले आहे. पातोंडा अमळनेर रोडवर असलेल्या ध्यान केंद्र परिसर, बस स्टॅण्ड परिसर,माहिजी देवी रोड आदी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली असून त्यासोबतच महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत बिहार व मियावाकी पॅटर्नच्या सहाय्याने हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड झाली आहे.   बिहार पॅटर्न अंतर्गत झालेल्या वृक्षारोपण वेळी ग्रामस्थांकडून विरोध झाला होता पण त्याच बिहार पॅटर्न अंतर्गत आज तेथील वृक्ष मोठ्या दिमाखात हरियाली निर्माण करत असून पुरस्काराचे श्रेय सर्व वृक्षलागवडीसाठी झटलेल्या सर्व मावळयांना दिले जात आहे.

संगमनेरचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सांगितले की , पातोंडा परिसर विकास मंच ही  अमळनेर तालुक्यातील सामाजिक संस्था महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बिहार पॅटर्न आणि मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवडीच्या माध्यमातून व सामूहिक वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक वर्षांपासून निरंतर कार्यरत आहे.या तरुणांच्या संघटनेला वनश्री पुरस्कार मिळाल्यामुळे भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या नवीन उपक्रमासाठी त्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.त्यांचे काम इतरांसाठी मार्गदर्शक आहे.

 

Protected Content