जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुंदडा हायस्कूल येथील वाचमनचा शाळेतील पाण्याच्या हौदात पडून बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किशोर दत्तात्रय चोधरी (वय-४२) रा. मुदंडा हायस्कूल, जळगाव असे मृत झालेल्या वाचमनचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर चौधरी हा गेल्या ८ वर्षांपासून मुंदडा हायुस्कूल येथे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शाळेतील वाचमनचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास किशोर हा घरी होता. शाळेतील हौदातून पाणी काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जावून पडला. त्यात त्याला बूडून दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान , किशोरची पत्नी विद्या यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. परिसरातील नागरीकांनी तात्काळ धाव घेवून मृतदेह बाहेर काढला आणि तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या आई लताबाई, वडील दत्तात्रय चौधरी, पश्चात पत्नी विद्या, मुलगा आदित्य (वय-१२), मुलगी आराध्या (वय-१०), लहान भाऊ संजय चौधरी असा परिवार आहे.