अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसे धरणाचे काम युद्धपातळीवर सुरू व्हावे या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाण्यासाठी होणारा संघर्ष आता देश,राज्य,जिल्हा व तालुका पातळीपर्यंत येऊन ठेपला आहे. चोपडा तालुक्यातही पाण्याचा प्रश्न गंभिर झाला असून पाण्याचे महत्व लक्षात घेऊन शासनाने तत्परतेने पाडळसे धरणाचे काम सुरू करावे,असे आवाहन आंदोलनास पाठिंबा देतांना त्यांनी केले. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष संदिप भैय्या पाटिल यांनीही आंदोलनास काँग्रेस पक्षाचा पाठिंबा जाहीर केला.
राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य प्रभारी शिवाजीराव पाटिल यांनी आंदोलनात सक्रिय होत आवाहन केले की,’देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न कायम ठेवून त्यावर राजकारणाची पोळी शेकली जाते! आज पर्यंत शेतकऱ्यांचे सरकार या देशात न आल्याने शेतकरी जनता देशोधडीला लागली आहे!’ यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चाचे राज्य प्रभारी शिवाजी नाना पाटील,हिरालाल पाटील, संदिप सैदाने,मनोज महाजन,नितीन शेलकर, यशवंत महाजन ,रमेश पाटील,दिनेश बिऱ्हाडे,रमेश घोलप, रणजित शिंदे,अड.प्रशांत संदानशिव,ऍड. दिनेश पाटिल व सहकारीही उपोषणात सहभागी झाले. संघर्ष समितीच्यावतीने सुभाष चौधरी, मा.कुलगुरू शिवाजीराव पाटील, एस.एन.पाटील आंदोलनास संबोधित केले.
याप्रसंगी अर्बन बँक च्या व्हाईस चेअरमन वसुंधरा लांडगे यांनी शेतकरी गीते सादर केली.एन.के.पाटील यांनी बळीराजा कवितेतून शेतकरी व्यथा मांडली. चोपडा सूतगिरणी चे व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे,किशोर दुसाने,चोपडा रा.का.अध्यक्ष राजेंद्र पाटील,चोपडा शेतकरी संघाचे अध्यक्ष शेखर पाटिल उपस्थित होते. यावेळी मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटिल ,अमळनेर काँग्रेस चे माजी अध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,शेतकरी संघटनेचे सुपडू बैसाणे, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळचे सेक्रेटरी संदिप घोरपडे,वृक्षमित्र पंकज पाटिल, ऍड. वर्षा अग्रवाल,तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटिल, ढेकूचे नीलकंठ पाटिल, चंद्रकांत साळी आदिंनी संबोधित केले.
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी दाऊदि बोहरी समाजतर्फे अब्बास अली,अबुल कादिर बुकवला,इंद्रिस मुझफ्फर,मुस्तफा भाई,खदीर सादिक,मोहम्मद करमपूरवाला आदिंसह अमळनेर बडगुजर समाज च्या वतीने राजाराम बडगुजर व सहकारी,अखील भारतीय ग्राहक पंचायत चे मकसूद बोहरी,राजेंद्र सुतार,विजय शुक्ल, अड.भारती अग्रवाल,सौ.ज्योती जोशी,उर्मिला अग्रवाल, प्रमिला पाटिल यांचेसह डॉ.संजय शहा,दशरथ लांडगे,विजय ठाकूर, अड.तिलोत्तमा पाटिल,पारसमल जैन ,सुनिल मोरे,दिनेश साळुंखे, भाऊसाहेब पाटील आदिंनी पाठींबा देत उपोषण केले. तर श्रीकृष्ण मित्र मंडळ,देशभक्त मित्र मंडळ पदाधिकारी युवाकार्यकर्ते ही सहभागी झाले.
दिवसा आंदोलन रात्री खेडोपाडी जागर
आंदोलनास खेडोपाडी पोहचविण्यासाठी रोज ग्रामिण भागात सायंकाळी धरण प्रश्नाचा जागर करायला संघर्ष समितीचे पदाधिकारी निघतात. समितीचे एस.एम.पाटिल हे योगेश पाटील, आर.बी.पाटील, महेश पाटील, डी. एम.पाटील, अजय पाटिल, सुनिल पाटिल, प्रभाकर पाटील,पुरुषोत्तम शेटे आर.व्ही.पाटिल,रामराव पवार, सतिष काटे,देविदास देसले,प्रशांत भदाणे, एस.एस.साळुंखे,हिम्मत पवार आदि कार्यकर्ते खेडोपाडी चौक बैठका घेत दिवसभर नेटाने आंदोलन चालवीत आहेत.