अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मागील अडीच ते तीन वर्षात अतिवृष्टी, पिकविमा, शेतकरी कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांच्या विविध योजनांतून कोणतीही मदत असेल यासाठी जवळपास ५०० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला लावणारा अमळनेर मतदारसंघ एकमेव असून विकास कामा व्यक्तिरिक्त आपण केलेले हे मोठे काम आहे असा खुलासा आ. अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत करत . तालुक्यातील ४० गावातील अतिवृष्टीचा पैसा जीआर काढून मोकळा केल्याने मुख्यमंत्र्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले.
तालुक्यात सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या ४० गावातील अतिवृष्टीचा पैसा मिळविण्यासाठी शासन दरबारी प्रचंड खटाटोप त्यांनी केला असताना गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी शासनाकडून पैसे वितरित करण्याचा जी आर निघाल्याने यासंदर्भात त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा प्रवास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन त्यांनी केले होते. यावेळी पाठपुराव्याचे अनेक पुरावे सादर केलेत. धरणाचा केंद्राच्या पीएमकेएस वाय योजनेत समावेशासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुप्रमा झाल्यावर साधारणपणे ५००० कोटीच्या आसपास धरणाचा बजेट जाईल. योग्य वाटचाल राहिल्यास येत्या मार्चपर्यंत धरणाचा पीएमकेएस कोटी मिळाल्याने अनेक बंधारे पूर्णत्वास आले आहेत. अजूनही काहींचे काम सुरू आहे. याव्यतिरिक्त पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने मतदारसंघात तब्बल ९० गावांना जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मिळाल्या आहेत. येणाऱ्या काळात त्या पूर्ण झालेल्या असतील असे सांगत सत्तेचा काळ गेला आता विरोधी आमदार असलो तरी आपली आक्रमकता या अधिवेशनात जनतेने प्रत्यक्ष पहिली असून पाहिजे तेवढा निधी खेचूनच आणणार असा दावा आमदारांनी यावेळी केला.