मुंबई (वृत्तसंस्था) पाच हजारांहून अधिक लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला आरोग्यमंत्री टोपे यांनी आज भेट दिली. कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. ही यंत्रणा सक्षमपणे काम करत असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३२१ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत असल्याने येथे धोका वाढला आहे. गेल्या बारा तासांत राज्यात एकूण १८ नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत १६ नवे रूग्ण तर पुण्यात २ नव्या रूग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. राज्यातील रुग्णांची संख्या तीनशे पार झाल्याने राज्यातील परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
🔔फेसबुक पेज : https://bit.ly/2QSCeHB
🔔युट्यूब पेज : https://bit.ly/2UuRmx3