पाचोऱ्यात संजीवनी हाॅस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  भारत विकास परिषद शाखा पाचोरातर्फे शिवजयंती निमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी येथील भडगाव रोडवरील संजीवनी हाॅस्पीटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

संजीवनी हाॅस्पिटलमध्ये सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शहरासह परिसरातील  रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.  शिबीर यशस्वी करण्यासाठी संजीवनी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. नरेश गवांदे, भारत विकास परिषदेचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रितेश संकलेचा, उपाध्यक्ष डॉ. अतुल पाटील, सचिव संदिप पाटील, सहसचिव नितीन सोनवणे, कोषाध्यक्ष डॉ. हर्षल देव, महिला समन्वयक अंजली गवांदे, प्रोग्राम डायरेक्टर सतिष जाधव, डॉ. संजय जाधव यांचे सह संजीवनी हाॅस्पिटलच्या संपूर्ण टिमने काम पाहिले.

 

 

 

Protected Content