पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनी दोन दिवस अगोदरच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पताके व महाराजांच्या पुतळ्या जवळील परिसर रोषणाई करुन संपूर्ण परिसर भगवामय केला होता. जयंतीनिमित्त मराठा समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकारी व युवकांनी संपूर्ण शहरात मोटरसायकल रॅली काढून शिवजयंती उत्सव साजरा केला. यामध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, तहसिलदार कैलास चावडे, नगराध्यक्ष संजय गोहिल, पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, संजय वाघ, डॉ. भुषण मगर, डॉ. स्वप्निल पाटील, यांचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, काँग्रेस, आर.पी.आय.चे पदाधिकारी व मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी माल्यार्पण करुन शिवजयंती साजरी केली.
शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जळगांव व छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, डॉ. शंकर सोनवणे, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, अकाउंट विभागाचे महेश सोनगिरे, टेक्निशियन दिक्षा कांबळे, उमाकांत शिंपी, पाचोरा येथील कौशल्या लॅबोरेटरीचे संचालक डॉ. गोरख महाजन सह छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक यांनी सहकार्य केले. शिबिरास आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी भेट दिली. प्रसंगी सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील यांचेतर्फे रक्तदाते व शिवभक्तांसाठी पोहे व दुध वाटप करण्यात आले.
शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शिवसेना कार्यालयात आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्षा प्रियंका वाल्मिक पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, नगरसेवक रहिमान तडवी, अॅड. दिनकर देवरे, सुधाकर महाजन, पप्पु राजपुत, नसीर बागवान, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, नाना वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याचे पुजन व माल्यार्पण करुन अभिवादन केले.