पाचोऱ्यात मराठा समाज बांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील स्व. राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये आयोजित अखिल मराठा समाज बांधवांची महत्वपूर्ण बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाज बांधवांना एकत्र केले जात आहे.

 

अखिल भारतीय मराठा समाजाच्या बैठकीत मराठा समाजाला उद्भवणाऱ्या शैक्षणिक, उद्योग यासह अनेक समस्यांचे निवारण कसे करावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या बैठकीत  मराठा समाजाचे मंगल कार्यालयात व्हावे तसेच नुतन कार्यकारिणी व समिती गठीत करणे म्हणून येत्या १५ आॅगस्ट रोजी पाचोरा शहरात तालुक्यासह परिसरातील मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले. या बैठकीस शहरासह ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी एकत्र येण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून गृप तयार करत समाज हितासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी एकवटले असल्याचे दिसत आहे.  मराठा समाजाच्या हितासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विविध सुविधा त्यासोबत शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी राज्यासह जिल्हाभरात विविध समाजाची बांधणी सुरू आहे. याच माध्यमातून पाचोरा तालुक्यातील मराठा समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी व्हाट्सअप गृप तयार करण्यात आला आहे. यात असंख्य मराठा समाज एकवटले आहेत.

 

Protected Content