पाचोऱ्यात कॉग्रेसच्या उच्चस्तरीय समितीचा दौरा

 

पाचोरा, प्रतिनिधी । कॉग्रेस पक्षाने वर्ष भराचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिति गठीत केली असून या समितीने पाचोऱ्यात येवुन आढावा घेतला तर तालुका अध्यक्ष पदासाठी सचिन सोमवंशी यांच्या नावाने एकमताने ठराव करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीमध्ये मुख्य समन्वयक भागवतराव सुर्यवंशी, समन्वयक मनोज पाटील, मुन्ना शर्मा, के. डी. चौधरी यांचा समावेश होता. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोरा शहर व ग्रामीण कॉग्रेस पक्षातील कामाचा आढावा घेतला यात वेगवेगळ्या आंदोलनाचा आढावा घेतला. शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांनी शहराची कामगिरी सांगितली तर तालुका सरचिटणीस प्रताप पाटील यांनी तालुक्याचा आढावा दिला. या बैठकीत नुतन तालुका अध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे घेण्यात आली. यावेळी राजेंद्र महाजन, किशोर गरुड, सचिन सोमवंशी यांचे नावे आल्यावर समितीने तिघा इच्छुकांना एकत्र बसुन एकच नाव देण्याच्या सूचना केल्यावर राजेंद्र महाजन सुचक तर किशोर गरुड अनुमोदक म्हणून त्यांनी सचिन सोमवंशी यांच्या नावाची शिफारस केली. एकच नाव आल्याने तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. यावेळी बैठकीत जिल्हा पदाधिकारी विकास वाघ, नंदु सोनार, सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, अनिल पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अंबादास गोसावी, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शरीफ खाटीक, ईस्माईल तांबोळी, धनंजय पाटील, जिल्हा महिला वकील अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, वृषाली महाजन, गणेश पाटील, राहुल शिंदे, समाधान ढाकरे, कल्पेश येवले, मुकेश पाटील, संदीप पाटील, शिवराम पाटील, राहुल वाघ, बंटी सोनवणे आदी उपस्थित होते.

Protected Content