पाचोरा प्रतिनिधी । शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील आर्शिवाद कंम्पुटर्सतर्फे शिक्षक दिना निमित्त शाळेचे प्रतिनीधित्व करणार्या मुख्याध्यापकांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
शहर व पंचक्रोशीतील तरूण, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासह सर्वांनाच संगणक तंञज्ञानाचा वापर करता यावा, प्रचार प्रसार होऊन संगणकाची गोडी निर्माण व्हावी यासाठी गेल्या २२ वर्षांपासुन अनेक विविध सामाजिक उपक्रमातुन आर्शिवाद कंम्पुटर्स आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडित आहे. दि. ५ सप्टेंबर शिक्षक दिन संपुर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. या शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आर्शिवाद कंम्पुटर्सचे संचालक अतुल शिरसमणे यांचेतर्फे शाळांचे प्रतिनिधित्व करणारा मुख्य घटक म्हणजे मुध्याध्यापक, प्राचार्य यांचा सन्मान करण्यात आला.
यात श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले, शिंदे इंटरनॅशनलचे प्राचार्य विजय पाटील, निर्मल इंटरनॅशनलचे प्राचार्य गणेश पाटील, तात्यासाहेब आर. ओ. पाटील महाविद्यालयाचे प्रदिप सोनवणे, गो.से. हायस्कूल चे मुख्याध्यापक सुधीर पाटील, पि. के.शिंदे विद्यालयाचे एस. व्ही.गिते, आदर्श माध्यमिकच्या के. डी. पाटील, बुऱ्हानी इंग्लिश मिडीयमचे ज्ञानेश्वर देवरे, मनीषा पाटील, जयकिरण प्रभाजी न्यु इंग्लिश मेडिअम स्कुलच्या प्राचार्य पुष्पलता पाटील यांना सन्मानित करण्यात आले. दरवर्षी शक्य होइल तितक्या शिक्षकांचा सन्मान करण्याची आशिर्वाद कंम्पुटर्सच्या परंपरेला गेल्या दोन वर्षाच्या महामारीने अडथळा निर्माण झाला असला तरी मुख्याध्यापकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करून ही परंपरा सुरूच ठेवली आहे. आशिर्वाद काम्पुटर्सच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल आशिर्वाद काम्पुटर्सचे सर्वेसर्वा अतुल शिरसमनी व त्यांच्या सर्व टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.