पाचोऱ्याच्या बडोदा बँकेत चोरीचा प्रयत्न

 

पाचोरा : प्रतिनिधी ! शहरातील भडगाव रोडवर निर्मल सिड्स या कंपनी समोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा मध्ये रात्रीच्या वेळेस बॅंकेची खिडकी तोडून २ ते २:३० वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी वीज पुरवठा बंद करून सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, व्ही. सी.आर. यांच्या केबल तोडून नुकसान केले.

चोरटे लॉकर पर्यंत पोहचू शकले नाहीत हा प्रकार सकाळी ९ वाजता बँकेत कर्मचारी आल्यावर समोर आला.

.
सुमारे २० हजार रूपये च्या वायर व खिडकीचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती बॅक मॅनेजर विक्रात अशोक शर्मा  यांनी पाचोरा पोलीसात दिली पाचोरा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील सह श्र्वान पथक, फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करूण सदर घटनेचा पंचनामा केला पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय मालचे करीत आहेत.

Protected Content