Home धर्म-समाज पाचोरा शहरासह तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी मनमानी कारभार थांबवा — रयत सेनेचे मागणी

पाचोरा शहरासह तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांनी मनमानी कारभार थांबवा — रयत सेनेचे मागणी

0
25

 

पाचोरा, प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांचा सुरू असलेला मनमानी कारभार थांबवावा या मागणीसाठी रयत सेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

शहरातील काही रेशनिंग दुकानदार हे ग्राहकांना थंब मशिनद्वारे येणारे बिल देत नाहीत. तसेच अनेक रेशनिंग दुकानदारांनी आपल्या रेशनिंग दुकानासमोर धान्य उपलब्धतेचे फलक ही लावलेले दिसुन येत नाही. यासारख्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडुन येत आहेत. या रेशनिंग दुकानदारांची मनमानी थांबवावी अशी मागणी रयत सेनेतर्फे तहसिलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी  रयत सेनेचे तालुका अध्यक्ष रमाकांत पवार, शहर अध्यक्ष रामा जठार, शहर उपाध्यक्ष साहेबराव तडवी, सचिव चंद्रकांत दत्तु, समन्वयक इरफान शेख मणियार, प्रसिध्दी प्रमुख विनायक मोरे, डॉ. दिनेश जगताप, वैभव इंगळे, दिपक मोरे उपस्थित होते. तहसिलदार यांचे तर्फे नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी निवेदन स्विकारले.


Protected Content

Play sound