पाचोरा शहरातील महत्वाच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तर्फे शहरात गतीरोधक बसवण्यात यावे या मागणीसाठी ४ जुलै रोजी प्रांताधिकारी व नगरपरीषदेचे बांधकाम विभागास निवेदन देण्यात आले.

 

निवेदन देते प्रसंगी शहर प्रमुख अनिल सावंत, अॅड. दिपक पाटील, शहर संघटक राजेंद्र राणा, शहर समन्वय बंडु मोरे, मा. शहर प्रमुख भरत खंडेलवाल, मा. उपशहरप्रमुख कैलास मिस्त्तरी, युवासेना तालुकाप्रमुख भुपेश सोमवंशी, कुंदन पंड्या, जयश्री येवले, अभिषेक खंडेलवाल, खंडु सोनवणे, गफ्फार शेख, पप्पु राजपुत उपस्थित होते.

 

पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौक दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावर शहरातील प्रचंड मोठ्या प्रमाणावर दळणवळण तथा नागरिकांचे पायी येणे जाणे आहे. वाहनांची खूपच आहे. तरुण युवक भरधाव वेगाने वाहने चालवतात. म्हणुन अपघातांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दुखापत होते. अपघात झाल्याने अवयव देखील निकामी होतात. अपंगत्व येऊन आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे.

 

नागरिकांची प्राण हानी वाचावी. सुखकर प्रवास व्हावा, अपघात टाळावेत याकरिता कॉलेज चौक महाराणा प्रताप चौक, निरामय हॉस्पिटल, साई मंदिर चौक, वीतराग प्रोव्हिजन, भुयारी मार्गा जवळ, सुपडू भादू शाळा, कन्या शाळा, जागृती शाळा व इतर शहरातील आदी ठिकाणी गतिरोधक निर्माण करून पाचोरा नगरीतील नागरिकाचे जीवन सुरक्षित व प्रवास सुखकर होईल. अपघाताचे धोके कमी होतील. याकडे गांभीर्याने लक्ष देवुन तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावे अशा आषयाच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी व नगरपालिका प्रशासनास देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास उबाठा सेना पाचोरा शहर, शिवसेना – युवासेना, महिला आघाडी च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

Protected Content