पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील मुरलीधरजी माणसिंगका महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यालय जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील महालपुरे मंगल कार्यालयात “स्वर गुंजन” या देशभक्तीपर गीतांचा भव्य “एक शाम, देश के नाम” हा सदा बहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, मानद सचिव अॅड. महेश देशमुख, प्रा. डॉ. वासुदेव वले, सेवानिवृत्त प्रा. डॉ. बी. एन. पाटील, उच्चमाध्यमिक विभागाचे प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, संचालक सुरेश देवरे, सीताराम पाटील, दत्ता बोरसे, प्रकाश पाटील, जगदीश सोनार, भरत सीनकर, उत्तर महाराष्ट्र विभागीय विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी, माजी सैनिक सेनेचे अध्यक्ष बाळू पाटील, दिपक पाटील, उत्तमसिंग निकुंभ, मधुकर पाटील सह मान्यवर महिला व संगीतप्रेमी उपस्थित होते.
पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात दि. २४ रोजी रविवारी रात्री ८ ते १० या दोन तासात झालेल्या सदाबहार कार्यक्रमात तहसिलदार कैलास चावडे यांनी “अब तुम्हारे हवाले वतन साथीयों”, “हा देश माझा, याचे भान जरा राहु द्या” या गीतांनी रसिकांचे डोळे ओले चिंब झाले होते.
तर राकेश सपकाळ “कर चले हम फिदा जाॅं वतन साथीयों”, “मेरे देश प्रेमियो, आपस में प्रेम करो”, “जिंदगी मौत ना बन जाये संभालो यारो”, “मेरे देश की धरती सोना उगले”, डॉ. भारतकुमार प्रजापत यांनी “है प्रीत जहाकी रीत सदा”, रितेश प्रजापत यांनी “जहाँ हर डाल पर सोनेकीं चिडीया”, रोशनी घाडगे यांनी “दिल दिया है जान भी देंगे”, कुमार वेदांत माळी याने ”तेरी मिट्टी मे मिल जावा”, एस. ए. पाटील यांनी “जय जय महाराष्ट्र माझा”, कु. सिद्धी विनोद कुलकर्णी या अकरावीच्या विधार्थीनीने “मेरा मुल्क मेरा देश”, राजू पंडित यांनी “ए मेरे प्यारे वतन तुझपे दिल कुर्बान” या गाण्यांनी रसिकांची मने जिंकली.
पाचोऱ्यात अनेक वर्षांनंतर स्थानिक कलाकार व संगीत प्रेमींनी म्हटलेल्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाला वेगळाच रंग आला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वासुदेव वले, सूत्रसंचालन जे. व्ही. पाटील तर उपस्थितांचे आभार प्रा. माणिक पाटील यांनी मानले.