पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील संघवी काॅलनीतील दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार सेवा केंद्रात ११ डिसेंबर रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत एकदिवसीय तालुका व जिल्हास्तरीय मुल्यसंस्कार व्यक्तीमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सेवा मार्गाच्या १ ते १८ विभागांचे सर्व स्टाॅल, नक्षत्र वन, परस बाग, शिशु संस्कार पारंपरिक वस्तु, गायन – वादन कला, पालक समस्या समुपदेशन स्टाॅल, विद्यार्थी व युवक, युवती समुपदेशन, या विषयांचे आकर्षक स्टाॅल लावण्यात येणार आहे. तसेच शिशु संस्कार मार्गदर्शन (पंचेद्रिंय विकास डेमो), सार्वांगिन विकास डेमो (सामाजिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास, शारिरीक विकास, बौद्धिक विकास), संस्कार कार्ड (एक बौद्धिक क्रांती व व्हिजन कार्ड डेमो), बाल संस्कार काळाची गरज (संस्कारातुन विश्वकल्याणाकडे..) या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या एकदिवसीय शिबीराचा जास्तीत जास्त विद्यार्थी, भाविक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातील आयोजकांनी केले आहे.