Home प्रशासन तहसील पाचोरा येथे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याहस्ते ध्वजारोहण

पाचोरा येथे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्याहस्ते ध्वजारोहण


पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथील पोलिस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, तहसिलदार कैलास चावडे, नायब तहसिलदार संभाजी पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, न. पा. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील, राहुल मोरे, दत्तात्रय नलावडे, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता दिलीप पाटील यांचे सह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते. 

सकाळी ९ वाजुन १४ मिनिटांनी उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी मानवंदना दिली. तसेच तहसिलदार कैलास चावडे यांनी संविधान सरनाम्याचे वाचन केले. यावेळी गो. से. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन केले.


Protected Content

Play sound