पाचोरा येथे आज गुजर समाज बांधवांची बैठक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ध्येय करियर अकॅडमीमध्ये आज दुपारी गुजर समाजाची महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

 

८ एप्रिल २०२३ शनिवार रोजी रावेर येथे लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली लेवे गुजर समन्वय समिती (रावेर, मुक्ताईनगर, बुर्‍हानपुर विभाग) तर्फे गुजर समाजाच्या बंधु भगिनींची जिल्हास्तरीय सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत रावेर, मुक्ताईनगर व बुर्‍हानपुर तालुक्यातील प्रत्येक गावातील गुजर समाज मंडळाचे प्रतिनीधी व समाज बांधवांसह जिल्ह्यातील समाज बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी समाजातील लग्न विधी कार्यक्रम, शैक्षणिक कार्य, मरणातील विधीवत कार्य या विषयावर सुमारे तीन तास चर्चा झाली. सभेतील चर्चेअंती तीन ठराव पारीत करण्यात आले. यामध्ये   प्री वेडिंग पूर्णपणे बंद, लग्नात तृतीयपंथी (नाचा) नाचवण्यावर पूर्णपणे बंदी, जानोसा ठिकाणी पोहा किंवा नास्ता ठेवण्यास मनाई यांचा समावेश होता.

 

वरील ठरावास सर्व उपस्थितांनी मोठ्या आवाजात टाळ्यांच्या गजरात हात वर करुन अनुमोदन दिले संम्मत झालेल्या ठरावाचे उल्लंघन होणार नाही व अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रत्येक गावात स्थापन करण्यात आलेल्या गुजर मंडळांनी महीला व पुरुषांची सभा घेऊन सुचना करण्यात याव्यात असे ही ठरले.

 

रावेर येथे संपन्न झालेल्या या ऐतिहासिक सभेमध्ये आपल्या समाजातील विविध भागातून तसेच विविध स्तरातून आलेल्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग खरोखरच लक्षणीय आणि वाखाणण्याजोगा होता. समाजातील महीलामंडळ आणि पुरुषमंडळी यांनी समाजामध्ये आज रोजी चालू असलेल्या चाली-रीती, रूढी-परंपरा यावर उत्स्फूर्तपणे चर्चा करत आपापला सहभाग नोंदवला आणि आपले मत ठामपणे मांडले.

 

गुर्जर समाजातील सर्व स्तरावरील सर्व संघटना, सभा, परिषद, सेना, परिसर, मंडळ, गट, तट, मतभेद बाजुला ठेऊन गुर्जर समाजातील प्रत्येक घटकाचे सहकार्य या प्रबोधनासाठी अपेक्षित आहे. या अनुषंगाने पाचोरा शहर व तालुका परिसराने देखील आज दिनांक १६ एप्रिल रविवार रोजी दुपारी ४ वाजता ध्येय करीअर अकॅडमी मधील स्व. स्वा. सै. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन सभागृहात गुजर समाजातील बंधु – भगिनींची बैठक आयोजित केली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content