पाचोरा, प्रतिनिधी । स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनेशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड चॅलेंज- २०२१ च्या विश्वविक्रमात पाचोरा येथील यशराज योगेंद्र गुढेकर याने सहभाग नोंदविला. तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ३९ उपग्रह बनवून या जागतिक विक्रमात सिंहाचा वाटा नोंदविला.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड चॅलेंज- २०२१ स्पर्धे अंतर्गत दि. ७ फेब्रुवारी रोजी भारतातील एक हजार विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात हेलियम बलून द्वारे प्रक्षेपण करून विश्वविक्रम, आशिया विक्रम, भारतीय विक्रम असिस्टंट वर्ड विक्रम स्थापित केला. हे प्रक्षेपण रामेश्वरम येथून करण्यात आले. जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे हे उपग्रह भारतीय विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या बनवून प्रक्षेपित केल्याने हे सर्व विक्रम प्रस्थापित झाले. यशराजने नागपूर व पुणे या ठिकाणी दि. १९ जानेवारी रोजी झालेल्या सॅटेलाईट मेकिंग कार्यशाळेत सहभाग घेऊन प्रत्यक्ष उपग्रह निर्मिती केली होती. यात
महाराष्ट्रातर्फे प्रक्षेपण आधी तिरंगा फडकावित तिरंग्याला मानवंदना देत मनिषा चौधरी यांच्या नेतृत्वात परभणीचे विद्यार्थ्यांसह प्रक्षेपण स्थळापर्यंत तिरंगा मार्च करण्यात आला. या प्रक्षेपणस्थळी देशातील इस्रो येथील शास्त्रज्ञासह कलाम कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय नौदलाचे अधिकारी आयपीएस अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.