पाचोरा नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड

पाचोरा प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेत तहसीलदार कैलास चावडे यांच्या उपस्थितीत विषय समितीच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली. ही निवड ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील नगरसेवक अशोक मोरे, बशिर बागवान, हाजराबी तडवी, मालती बापु हटकर, हर्षाली दत्तात्रय जडे, वासुदेव भिवसन माळी, रफिक बागवान, संगिता आनंदा पगारे, वाल्मिक पाटील, विकास पाटील, खान सईदाबी, राम केसवाणी तसेच मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, सभा लिपीक, राजेंद्र शिंपी, मंगेश माने, ललित सोनार, किशोर मराठे, आकाश खैरनार आदी कर्मचारी उपस्थित होते.

तसेच ५ जानेवारी रोजी झालेल्या विशेष सभेनुसार स्थायी समिती सदस्य म्हणून सुनिता किशोर पाटील, संजय ओंकार वाघ, धमेंद्र उत्तम चौधरी यांची निवड करण्यात आलेली आहे. आज झालेल्या आॅनलाईन समिती सभापती निवड मध्ये शरद बाळकृष्ण पाटे – पदसिध्द सभापती (नियोजन व विकास समिती) वासुदेव भिवसन माळी (सार्वजनीक बांधकाम समिती), रफिक गफ्फार बागवान (शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती), मालती बापु हटकर (स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती), विकास संतोष पाटील (पाणीपुरवठा आणि जलनिसा:रण समिती), संगिता आनंदा पगारे (महिला व बालकल्याण समिती) याप्रमाणे समित्यांचे सभापती म्हणुन बिनविरोध निवडुन आल्याचे तहसिलदार कैलास चावडे यांनी जाहीर केले.

Protected Content