पाचोरा प्रतिनिधी । कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करतांना तोंडावर मास्क लाव बोलल्याच्या रागातून नगरपालिका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक बागवानसह तिघांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा येथे कोरोना महामारीची साकळी तोडण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिस शहरात संयुक्त कारवाई करीत आहे. या पालीका प्रशासनाने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ या सह तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. २६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रफिक बागवान या नगरसेवकाने तोंडावर मास्क न लावता भाजीपाला विक्री करणे सुरू ठेवले असतांना त्यास पालिका कर्मचारी राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याने आपण तोंडावर मास्क लावा असे सांगीतले होते. त्यांनतर दोन दिवसांनी अनिल वाघ, राजेश कंडारे, पोलिस उपअधीक्षक विकास पाटील, सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, प्रकाश पाटील, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील हे दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्य बजावत असतांना त्या ठिकाणी नगरसेवक रफिक बागवान, महिद बागवान यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करुन राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचा हात घरुन युसुफ कालू बागवान याचेवर दंडात्मक कारवाई का केली. तूला येथे नोकरी करावयाची आहे का नाही. तू हे चांगले केले नाही. तू पोलिसांच्या नांदी लागू नको, ते आज आहेत, उद्या नाहीत असे बोलून ज्या ठिकाणी कारवाई केली होती त्या ठिकाणी घेऊन गेले व भाजीमंडीतील युसूफ बागवान यास बोलावून यांने तूझ्यावर कारवाई केली का ? असे विचारले व युसुफ बागवान याने हो सांगीतल्यानंतर नगरसेवक रफिक बागवान याने राजेंद्र उर्फ अनिल फकिरा वाघ याचे तोंडावरील मास काढून फेकले. व हातातील पावतीबुक फेकून दिले. त्यानंतर तिघांनी तोंडावर व छातीवर बुक्यांनी मारहाण केली. ते अनिल वाघ हे ओक्साबोक्शी रडत असतांना तोंड दाबून ठेवले आणि शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी माझे सोबत इतर दुकानावर कारवाई करीत असलेले सहाय्यक फौजदार नंदकुमार जगताप, सुनिल पाटील, विजयसिंग पाटील यांनी त्यांचे तावडीतून सोडविले, यामुळे पालिका कर्मचारी वाघ याने नगरसेवक रफिक बागवान यांचेसह तिघांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.