Home Cities पाचोरा पाचोरा काँग्रेसची ‘भारत जोडो’साठी जम्बो बैठक

पाचोरा काँग्रेसची ‘भारत जोडो’साठी जम्बो बैठक

0
46

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे या यात्रेत पाचोरा शहरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग राहणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी पाचोरा काँग्रेसने दि. ६ नोव्हेंबर रोजी जम्बो बैठकीचे आयोजन करण्यात आले.

शहरातील शासकीय विश्रामगृहात दि. ६ नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे सदरच्या बैठकीत प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक माजी जिल्हाध्यक्ष अॅड संदिप पाटील, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख आदी उपस्थितीत राहणार आहे. बैठकीत राहुल गांधी यांनी पायी सुरू केलेल्या कन्या कुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातुन असंख्य युवकांसह नागरिक उत्सुक आहेत. ६ नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात येत आहे यात्रेत जळगाव जिल्ह्य़ातील लोकांचा सहभाग दि. १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शेगाव येथील होणाऱ्या राहुल गांधी यांच्या विराट सभेत होणार आहे.

या यात्रेत सहभागी कसे व्हायचे यासाठी चर्चा होणार आहे. बैठकीत शहर व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.


Protected Content

Play sound