पहूर, ता. जामनेर, प्रतिनिधी । शहरात विना मास्क फिरणाऱ्या २४ जणांवर पहूर पेठे ग्रामपंचायत व पहूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला.
कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध कडक उपाययोजना राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहीमेत पहूर पोलीस पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, शशिकांत पाटील, उपसरपंच श्याम सावळे, रामेश्वर पाटील , ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर , माजी उपसरपंच रवींद्र मोरे, इका पहेलवान, विजय पांढरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी , पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.