जामनेर प्रतिनिधी | परम पूज्य सदगुरू सुदिक्षा माताजी यांच्या आशीर्वादाने संत निरंकारी मंडळ जामनेर शाखेच्या वतीने पहूर येथील संत निरंकारी भवन मध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
तालुक्यातील पहूर येथील संत निरंकारी भवन मध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन हिरालाल खैरनार झोनल (धुळे) व राजकुमार वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञान प्रचारक गणेश जी, नायब तहसीलदार सुभाष कुंभार, पूर्ण सरपंच पती रामेश्वर पाटील, उपसरपंच श्याम सावळे, परलाद वाघ, रतन सिंग परदेसी, प्रवीण शिंदे , राजू पाटील, अरुण घोलप, ज्ञानेश्वर पांढरे, राजू जाधव, चेतन रोकडे, रवींद्र घोलप, मनोज जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या रक्तदान शिबिरास चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत ६८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. व बाटल्या संकलन करण्यात आल्या. यावेळी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून आपण सर्वांनी इतर कोणाचा तरी आपल्या रक्तदानाने जीवाचे या हेतूने रक्तदान केले पाहिजे असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. संत निरंकारी जामनेर सेवादल युनिट १३५९ व पहुर गावातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण देशात संत निरकारी सेवाभावी संस्थेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना याचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.