पहूर जामनेर (प्रतिनिधी) । पहूर कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या संशयितांचे स्वॅब तपासणी अहवाल आज प्राप्त झाला असून त्यात तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा १५ वर पोहचला आहे. अशी माहिती वैद्यकिय अधिकारी यांनी दिली.
पहूर पेठ येथील एकाच कुटुंबात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांचे स्वॅब घेतण्यात आला होता. त्यांचा अहवाल आज दुपारी आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाले असून यात तीन रूग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ . हर्षल यांनी दिली. आढळून आलेल्या तीन रूग्ण हे हातमजूरी करणारे आहे.
आज घेतले तब्बल ३५ स्वॅब
पहूर मधील कोरोनाचा कहर वाढतच आहे. महावीर पब्लिक स्कूल येथील क्वॉरंटाईन सेंटरवर शेंदुर्णी येथील २ तर सोनाळा येथील १३ जणांचे विलगीकरण करण्यात आले असून आर. टी.लेले हायस्कूल या क्वारंटाईन सेंटरवर पहूर कसबे येथील १३ तर लोंढरी येथील ७ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. एकूण ३५ जण सध्या पहूर येथे विलगीकरण कक्षात आहेत. या सर्व ३५ जणांचे स्वॅब आज घेण्यात आले आहे.
निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्कॅनिंग मोहीम
दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहूर पेठ आणि पहूर कसबे दोन्ही गावात थर्मल स्कॅनिंग आणि निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे . यात ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका सेवा देत आहेत. गावकऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यांनी केले आहे.