पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रार्श्वभुमीवर येथील क्रुषी निविष्ठाधारकांना बियाणे विक्री साठी निर्धारित वेळ निश्चित करून यावेळेत बियाणे विक्री करणे बंधनकारक असणार असून सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिल्या आहेत.
पहूर येथील कृषी निविष्ठाधारक असोसिएशनची बैठक पोलीस स्टेशनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्यात आली. यावेळी निविष्ठाधारकांनी सकाळी सात ते संध्याकाळी सात यावेळेत बियाणे विक्रीची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असून निविष्ठाधारकांनी केलेली मागणी मंजूर करण्यात आली. मात्र, दुकानांवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन ,विक्रेते व शेतकरी यांनी तोंडाला माक्स किंवा रूमाल बांधणे बंधन कारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कडक कारवाई चा इशारा साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिला आहे. यावेळी कृषी निविष्ठाधारक जि.प.माजी सभापती प्रदिप लोढा, माजी उपसरपंच आर. बी. पाटील, संतोष झवर अर्जून बारी, युवराज जाधव, मनोज जोशी यांची उपस्थिती होती. शेतकरी बांधवानी दुकानांवर गर्दी करू नये नियमांचे पालन करून बियाणे खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले.