पहूर. ता. जामनेर (वार्ताहर) तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषीमाता नगरातील रस्त्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून याकडे ग्रामपंचायत अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील संतोषी मातानगरातील नवघरे वायरमन यांच्या घराजवळील नाल्याजवळ सर्वत्र चिखलच चिखल आहे. दरम्यान पावसाळा नसतानाही या रस्त्यात चिखल दिसत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी याठिकाणी जेसीबीने रस्त्याचे काम केले. मात्र रस्त्यातच नळाचा वाॅल असल्याने या ठिकाणी ते त्रासदायक ठरत आहे. एकीकडे गावात विविध ठिकाणी विकास कामाचा सपाटा लावले असले तरी या खड्डेमय रस्त्याचा सर्वसामान्यांना जाणे-येणे ही एक डोकेदुखी ठरले आहे .या रस्त्यावर पायी चालणारे यांचे तोल घसरून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतीने या रस्त्याची मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात यावी.अशी मागणी संतोषी माता नगर रहिवाशांनी केली आहे