पहूर ता. जामनेर, प्रतिनिधी । पहूर येथील ख्वाजा नगर भागातील रहीवासी भाजपाचे तालुका अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शेख सलीम शेख गणी यांच्या राहत्या घरातून भर दिवसा १५ लाखाची रोकड अज्ञात चोरटयांनी लंपास करून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी (ता. ९ ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळी आज (ता १०) दुपारी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे , उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी भेट देऊन इमारतीच्या परिसराची पाहणी करताना गवतामध्ये लोखंडी टॅमी आढळून आली. या लोखंडी टॅमीचा उपयोग सदर घरफोडी ठी केल्याचा पोलीसांचा अंदाज आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे कि , शेख सलीम यांचे खॉजानगर भागात घर आहे . त्यांनी नुकताच फ्लॅटचा व्यवहार केल्याने १५ लाखाची रोख रक्कम घरात होती . गुरुवारी सकाळी ११ वाजता ते आपल्या कुटूंबियांसह जळगाव येथे मुक्कामी गेले होते . त्यांनी त्यांचा लहान भाऊ सद्दाम यांस रात्री घराकडे फेरी मारून घराकडे लक्ष देण्याचे सांगीतले . दरम्यान , दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शेख सद्दाम , शेख रफीक , शेख रईस हे तीन्ही भाऊ सुद्धा जळगाव येथे कार्यक्रमासाठी गेले होत. शेख सलीम हे कार्यक्रम आटोपून आपल्या घरी परतले असता त्यांना घराच्या प्रवेश द्वाराचा मुख्य दरवाजा उडघण्याचा प्रयत्न करण्याच्या खुणा आढळल्या , घरात शिरताच स्वयंपाकगृहाचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी कपाटाची पाहणी करताच त्यातील १५ लाख ८ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांना समजले. या घटनेची माहीती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे ,अमोल देवढे ,संदीप चेडे , शशीकांत पाटील यांनी धाव घेतली . अवघ्या तासाभरात पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे , सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी भेट दिली . रात्री उशिरा श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते . या प्रकरणी शेख सलीम शेख गणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवी कलम ४५४, ४ ५७ , ३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल देवडे करीत आहेत .
आज शनिवारी सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी करताना त्या ठिकाणी गवतामध्ये फेकलेली लोखंडी टॅमी आढळून आली . घरफोडीसाठी या लोखंडी सळईचा वापर केल्या गेला असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला . त्या दिशेने तपास चक्रे सुरू असून घटनास्थळी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकानेही भेट देऊन पाहणी केली . यात पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे , पो.कॉ .महेश महाजन, पो.कॉ.विजय पाटील , पो. कॉ . सचिन महाजन , पो.कॉ. भगवान पाटील ,पो. कॉ .राजेंद्र पाटील यांचा समावेश होता .
दरम्यान अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे यांनी आवाहन केले आहे की, पोलीस नेहमीच जनतेच्या सोबत आहेत . गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने करून दोषींवर योग्य ती कारवाई करू. तपासकामी ३ संशयीतांना ताब्यात घेतले आहे . नागरीकांनी बाहेर गांवी जाताना रोख रक्कम घरी न ठेवता बैकेत ठेवावी.