Home क्राईम पहूर येथील गोसावी वाडी जवळ भीषण आग; जीवितहानी नाही

पहूर येथील गोसावी वाडी जवळ भीषण आग; जीवितहानी नाही


पहूर ता जामनेर (वार्ताहर )| पहूर शेंदूर्णी रोडलगत असलेल्या गोसावी वाडीच्या पाठीमागे सुचवून ठेवलेल्या जुळावू लाकडांना अचानक आग लागल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील पहूर, शेंदूर्णी रोडलगत पावर हाऊसच्या समोर असलेल्या गोसावी वाडीच्या पाठीमागे साठवून ठेवलेल्या जुळावू लाकडांना अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीचेवृत्त समजताच ग्रामस्थांनी आग विझवून आटोक्यात आणण्यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व पहूर कर ग्रामस्थ मंडळी व सर्व तरूणांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यात अचानक लागलेल्या आगीचे वृत्त समजताच येथील सुभाष क्षिरसागर व सुरेश द्राक्षे या दोघांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता ताबडतोब आपले खाजगी पाण्याचे टँकर आणुन आग आटोक्यात आणण्यासाठी तसेच पहूर येथील सर्व तरूण मंडळी व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.

एक तासानंतर आली अग्निशमन दलाची गाडी
रात्री साधारणपणे दहा वाजेच्या सुमारास लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करीत होते. तब्बल एक तासानंतर जामनेर येथून अग्निशमन दलाची गाडी आग आटोक्यात आणण्यासाठी दाखल झाली. या भीषण आगीत ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे कुठलेही जीवितहानी झाली नाही. भीषण आगीचे लोंढे पाहून गोसावी वाडीतील लोकांनी आगीपासुन आपला जीव वाचवण्यासाठी बाजूला शेतात रातोरात स्थलांतर केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound