पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी)। संपूर्ण राज्यात कोयना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. सगळीकडे गणपती विसर्जनावेळी गर्दी होऊ नये तसेच नदी, समुद्रात प्रदूषण होऊ नये यासाठी पहूर येथे ग्रामपंचायत पहूर पेठ व सुर्यकन्या एकता बहूउद्देशीय संस्थेचा यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथे देखील नदी प्रदूषण टाळण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत व सुर्यकन्या एकता बहुद्देशीय संस्थे मार्फत गणेश भक्तांसाठी निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते. पहूर गावातील गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलन केंद्राला चार वर्षांपासून उदंड प्रतिसाद मिळत आहे. यावेळी सरपंचपती रामेश्वर पाटील, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, पोलीस बंधू, ग्रामस्थ, पत्रकार बंधू, ग्रामपंचायत कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष चेतन रोकडे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.