पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील शेतकऱ्याच्या शेतातील गोदामाला अचानक आग लागल्याने सुमारे १३ क्लिंटल कापूस जळून नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यात पहूर कसबे येथील शेतकरी सुधाकर भास्कर पवार यांच्या शेतातील गोदामात कापसाच्या गंजीला आग लागल्याची घटना रविवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. हजारो रुपयांचा कापूस आगीच्या भक्षस्थानी पडला आहे. आधीच हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जात असताना आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १३ क्विंटल कापूस त्यांनी गोदामात ठेवला होता . विजेच्या शॉर्टसर्किटमुळे गोदामाला आग लागली .धुराचे लोट पाहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली . आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली .मात्र या आगीमुळे त्यांचे नुकसान झाले आहे .