पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून गंभीर दुखापत करणाऱ्या संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने पोलीस उपअधिक्षक रमेश चोपडे यांना देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, १४ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजता बस स्टॅन्ड रोड पहूर येथे कर्तव्य बजावत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी रविंद्र मोरे व अनिल सुरवाडे यांना दोन इसमांनी बेदम मारहाण केली व त्यांना गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या परिवाराचे मानसिक खच्चीकरण त्याठिकाणी झाले आहे. सदर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरुन पोलिसांच्या अंगावर हाथ टाकण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही. अशा आषयाचे निवेदन पोलिस उप अधीक्षक रमेश चोपडे यांना देण्यात आले. यावेळी पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे उपस्थित होते. जामनेर पोलिस बॉईज असोसिएशनतर्फे देण्यात आले. निवेदन देते प्रसंगी जामनेर पोलिस बाॅईज असोसिएशनचे तालुका अध्यक्ष दिपक पाटील व दत्तु पाटील उपस्थित होते.