भुसावळ, प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी भुसावळ तर्फे पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या राजकीय हिंसाचाराचा जाहीर निषेध व्यक्त करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे अशी मागणी प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ३ सीट वरून ७७ सीट मिळवत चांगली कामगिरी केली. परंतु नंदीग्राम येथील विधानसभा सीटवर तेथील तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पराभव झाल्याने व हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे तेथील तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये कायदा व्यवस्था हातात घेऊन मोठया प्रमाणात हिंसाचार करीत आहेत. बलात्कार, लुटमार करीत असून भारतीय जनता पार्टी समर्थक व कार्यकर्त्यांवर हल्ले करीत आहे व कार्यालयांची तोडफोड करीत आहेत. यात तेथील सरकार हे मूकदर्शक बनुन तेथील तृणमूल कांग्रेस कार्यकर्त्यांना एक प्रकारे पाठिंबा देत आहे. स्थानिक पोलिस प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहेत. तरी तेथील तृणमूल कांग्रेसद्वारे सुडाच्या भावनेने करण्यात येत असलेला हिंसाचार मानवते विरोधात असून सदरील हिंसाचार त्वरीत थांबवून दोषींवर कडक कारवाई करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावण्याची मागणी भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे करण्यात आली. या क्रुर हिंसाचाराचा भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरा तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला. निवेदनावर भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे,माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, जिल्हा चिटणीस शैलजाताई पाटील, गिरीश महाजन, सतिश सपकाळे,अजय नागराणी,निक्की बत्रा, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे,अमोल महाजन, संदीप सुरवाडे,युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुळकर्णी,राजु खरारे,विलास अवचार,संजय बोचरे,चंद्रशेखर पाटील,नंदकिशोर बडगुजर यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.