पवार विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांचा ग्लोबल प्रमाणपत्र देऊन गौरव

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील निंभोरी  येथील श्रीमंत दिग्विजय कृष्णराव पवार माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.

 

 

स्वीडन येथील इको ट्रेनिंग सेंटरतर्फे कोरोना काळात भारत आणि बांगलादेशातील शिक्षकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या “इंडिया-बांगलादेश टेलीकोलॅबरेशन प्रोजेक्ट” मध्ये सहभागी होऊन उत्तम प्रदर्शन करणारे निंभोरी विद्यालयातील इंग्रजी विषय शिक्षक ज्ञानेश्वर पाटील व इयत्ता १० वी तील विद्यार्थीनी मंजुश्री पाटील, निकिता जगताप, काळू राठोड, कुणाल जगताप, इयत्ता ९ वीतील साक्षी पाटील या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनी प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले. इको ट्रेनिंग सेंटर (स्वीडन), महाराष्ट्र शासन, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (नाशिक), शिक्षण विभाग – जिल्हा परिषद, जळगाव आणि बांगलादेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने “इंडिया बांगलादेश टॅली कोलॅब्रेशन प्रोजेक्ट” अंतर्गत संयुक्त राष्ट्र संघटनेने निश्चित केलेल्या १७ शाश्वत विकासाच्या ध्येयांपैकी ७ ध्येयांवर भारत आणि बांगलादेशातील शिक्षकांमध्ये विचार, अनुभव आणि पद्धतींचे आदान प्रदान करण्यात आले. या नावीन्य पूर्व उपक्रमात स्वतः सहभागी होऊन शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून भारत-बांगलादेश टॅली कोलॅब्रेशन प्रकल्पात बांगलादेशच्या इंग्रजी शिक्षिका इस्मत फर्जाना यांच्याशी संवाद साधून तसेच प्रकल्पात सहभागी विद्यार्थ्यानी संवाद साधून तेथील सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, जडण घडण याविषयीची माहिती जाणून घेतली याबद्दल संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपक्रमशीलतेचे संस्था चेअरमन अक्का वंदना पवार, सचिव अॅड. योगेश जगन्नाथ पाटील, विश्वस्त धैर्यशील पवार, प्रा. रविंद्र चव्हाण, अर्जुन पवार, अभिजित पवार, शाळेचे मुख्याध्यापक एस. ए. पवार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह परिसरातून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content