मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सीनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लगावला आहे. कोकण दौऱ्याच्या सुरूवातीला पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकले, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे असे ते म्हणाले, पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. जर माझे वडील असते तर ते त्याच वयाचे असते. शेवटी प्रत्येक बापाला हेच वाटतं की, आपल्या पोराला आपल्यापेक्षा कमी समजतं. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तिचं भावना असते. त्याहीपेक्षा मला असे वाटतेय की माझ्या खांद्यावरून, शरद पवार यांना बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.