नवी दिल्ली वृत्तसंस्था । चीन, कोरोना आणि लॉकडाउनवरून मोदी सरकारवर टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पर्यावरणीय प्रभाव मूल्याकंन मसुद्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या मसुद्याचा उद्देशच देशाला लुटण्याचा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. “देशाची लूट आणि पर्यावरणाचा विध्वंस थांबवण्यासाठी हा मसुदा मागे घ्यावा,” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
कोरोना , लॉकडाउन व भारत-चीन सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. राहुल गांधी यांनी आता पर्यावरणीय प्रभाव मूल्याकंन मसुद्यावरून मोदी सरकारवर निवडक उद्योगपतींना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी ईआयए२०२० मसुद्यासंदर्भात ट्विट केलं आहे. ज्यात हा मसुदा भयंकर असल्याचे म्हटले आहे.