परिवहन खात्यात ‘महावसुली’ ? : नाशिकमध्ये तक्रार दाखल

 

 

नाशिक : वृत्तसंस्था । परिवहनमंत्री अनिल परब आणि या खात्यातील उच्च अधिकारी बदल्यांमध्ये पैसे मागत असून या महावसुलीच्याविरूध्द नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

 

परिवहनमंत्री अनिल परब आणि आरटीओमधील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप त्यांनि तक्रारीत केला आहे.

 

या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त याची चौकशी करत आहेत. पाच दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.

 

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे.  या घोटाळ्याची निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे. देशपांडे यांनी ट्विट करून चौकशीची मागणी केली आहे. ”100 कोटीची महावसूली आता 300 कोटीवर? परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का?”, असा सवाल देशपांडे यांनी ट्विटमधून केला आहे.

Protected Content