जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त १९ ते २१ जानेवारी दरम्यान पंडीत कुमार गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
परिवर्तनचा हा संगीत महोत्सव मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाची सुरूवात १९ रोजी मूळच्या जळगावचा पण सध्या पुण्यात राहणार्या कस्तुरी दातार अट्रावलकर यांच्या शास्त्रीय गायनाने होईल. २० रोजी मिलिंद जोशी व मनिषा पवार जोशी हे शास्त्रीय संगीताच्या विविध रूपांचे सादरीकरण करतील. २१रोजी निखिल क्षीरसागर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल. महोत्सवास कविवर्य ना. धो. महानोर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, विजय बाविस्कर, अनिल पाटकर व मोहन थत्ते हे मार्गदर्शन करीत आहे. तर संजय पत्की, पद्मजा नेवे, रश्मी कुरंभट्टी, प्रांजली रस्से, संगीता म्हसकर, दुष्यंत जोशी, संजय बडगुजर, शुभांगी बडगुजर, श्रद्धा पुराणिक, गिरीश मोघे, आप्पा नेवे, वैशाली धुमाळ, भागवत पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.