जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या अस्थापनासह इतर ठिकाणी परप्रांतीय काम करत आहे. अशा परप्रांतिय कामागारांची नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद ठेवण्यात यावी, अश्या आशयाचे निवेदन गुरूवारी ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरासह संपुर्ण जिल्ह्यात विविध अस्थापना, कारखाने, जिनींग मिल, विटभट्टे या ठिकाणी परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने काम करत असतात. परंतू संबंधित मालक वर्गाकडून यांची नोंद जवळच्या पोलीस ठेवली जात नसल्याची गंभीर बाब धरणगाव जीनींग मील मधील तरूणाच्या खूनातून स्पष्ट झालेले आहे. वास्तविक पाहता कायद्यानुसार परप्रांतीय कामागारांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंदणे बंधनकारक आहे. याबाबत मनसेच्या वतीने सतत परप्रांतीयांची माहिती ठेवण्याची मागणी केली होती. राज्यात परप्रांतीय कोठून येतात, कोठे राहतात, काय करतात याची कोणतीही माहिती उपलब्ध नसते. तरी संबंधित अस्थापना मालक व ठेकेदारांनी त्यांच्याकडील सर्व परप्रांतीय मंजूरांची माहिती पोलीसांकडे देणे बंधनकारक आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पाऊल उचलावीत आणि परप्रांतीयाची माहिती अद्ययावत करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना देण्यात आले. याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमीन देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, निलेश वाणी, चेतन पवार, दिपक राठोड, खेमचंद कोळी, विशाल वाघमारे, किरण सपकाळे, प्रशांत बाविस्कर, महेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते.