Home क्राईम परकीय चलनाची तस्करी, राहत फते अली खानला ईडीची नोटीस

परकीय चलनाची तस्करी, राहत फते अली खानला ईडीची नोटीस


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परकीय चलन बेकायदेशीरपणे भारताबाहेर नेल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान,राहत फते अली खान गेल्या काही वर्षांपासून बेहिशेबी परकीय चलनाची तस्करी करत असून याबद्दल ठोस कारणे व पुरावे न दिल्यास त्याला ईडी अटक करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राहत फतेह अली खान यांची २०११ मध्ये दिल्लीतील विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी राहत फतेह अली खान यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १.२४ लाख अमेरिकी डॉलर सापडले होते. चौकशी दरम्यान इतकी रक्कम कुठून आली, याची माहिती खान देऊ शकले नाही. राहत फतेह अली खान यांनी परकीय चलनाची तस्करी केल्याचा संशय आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार खान यांनी ३,४०,००० डॉलर कमवले होते तर त्यातील २,२५,००० डॉलरची भारताबाहेर तस्करी केली होती. इतके डॉलर कसे कमवले आणि भारताबाहेर कुठे आणि का पाठवले असा सवाल ईडीने खान यांना विचारला आहे. जर राहत फत्ते अली खान यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर तस्करी झालेल्या रकमेच्या ३०० टक्के रकमेचा भूर्दंड भरावा लागेल. हा भूर्दंड न भरल्यास त्यांना अटकही करण्यात येऊ शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound