जळगाव, सचिन गोसावी । सध्या पेट्रोल व डिझेलमध्ये दररोज दरवाढ होत असून यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. या पार्श्वभूमिवर, आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव शहरात पथनाट्याच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
सध्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. या पार्श्वभूमिवर, आज राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यव्यापी निषेध आंदोलन केले. याच्या अंतर्गत जळगाव येथे पक्षाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मोहाडी रोडवरील पेट्रोल पंपासमोर पथनाट्य सादर करण्यात आले. यात इंधनाच्या दरवाढीमुळे देशवासियांना येत असणार्या समस्यांवरून सरकारवर टीका करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार मनीष जैन, नामदेवराव चौधरी, स्वप्नील नेमाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना माजी आमदार मनीष जैन व राज्य प्रवक्ते योगेश देसले यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. अभिषेक पाटील यांनी कच्च्या तेलाचे दर हे खूप कमी झाले असतांनाही मोदी सरकार दररोज इंधनात दरवाढत करत असल्याचे आरोप करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. या आंदोलनात सहभागी झालेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला.
खालील व्हिडीओत पहा जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन!
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/871004693768800
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/1724645967732577