Home Cities अमळनेर पत्रकारांना विशेष पॅकेज द्या : महाराष्ट्र पत्रकार संघाची मागणी

पत्रकारांना विशेष पॅकेज द्या : महाराष्ट्र पत्रकार संघाची मागणी

0
31

अमळनेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करीत आहेत,त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून महाराष्ट्र पत्रकार संघाने या निर्णयाचे स्वागत करत पत्रकारांना इतर घटकांप्रमाणे आर्थिक मदतीचे पॅकेज द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली आहे.

पोलीस,डॉक्टर व प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार, प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत. हे काम करीत असताना काही ठिकाणी पत्रकार बंधूंनाही पोलीसांनी मारहाण केली. तेंव्हा ओळखपत्र असणाऱ्या पत्रकारांना पोलीसांनी मारहाण अथवा अडवणूक करु नये अशी मागणी आहे. तसेच अनेक पत्रकारांना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो या सर्वांचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाने त्यांना आर्थिक मदतीचे पँकेज द्यावे तसेच या कालावधीत पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल/डिझेलचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा अशी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी आज केला. दि. २९ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल महाराष्ट्र पत्रकार संघ अमळनेर शाखेच्या वतीने राज्य कार्यकारणी सदस्य ईश्वर महाजन यांनी पाठविला आहे.


Protected Content

Play sound