जळगाव प्रतिनिधी । स्वत:च्या फायद्यासाठी पत्नीवर मित्राच्या मदतीने अत्याचार करणाऱ्या पतीनंतर रामानंद नगर पोलीसांनी आज मित्रालाही शहरातील वाल्मिक नगरातून अटक केली आहे. रमेश काकडे (रा. प्रल्हादनगर, पिंप्राळा-हुडको) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
अशी आहे घटना
अधिक माहिती अशी की, जळगावातील व्यावयिकाने आपल्या पत्नीवर पतीसह त्याच्या मित्र संशयित आरोपी रमेश काकडे (रा. प्रल्हाद नगर, पिंप्राळ हुडको) यांच्या मदतीने अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर ‘ही घटना कुणालाही सांगू नको नाहीतर मुलांना ठार मारेल’ अशी धमकी पतीने दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी पीडित विवाहितेला पतीने धुळे येथे माहेरी पाठवून दिले. दरम्यान, पिडीतेने आपबिती आपल्या आईवडीलांना कथन केले. हा प्रकार आईवडीलांच्या लक्षात आल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून पतीसह त्याचा मित्र रमेश काकडे यांच्या विरोधात पिडीतेच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे संशयित आरोपी फरार झाले होता. यातील मुख्य आरोपी पती हा जळगावातून रविवारी पळून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांला बसस्थानकातून अटक केली होती. त्याला पोलीस कोठडीत आहे.
दुसरा आरोपी रमेश काकडे हा जळगावाती राहत्या घरी आली असल्याची माहिती रामानंदनगर पोलीसांना मिळाली होती. त्यांनी तातडीने कारवाई करत दुपारी एक वाजता पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय परदेशी यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील, तुषार विसपूते, रूपेश ठाकूर आदींनी वाल्मीकनगरात सापळा रचून रमेश काकडे याला अटक केली. दरम्यान, गेल्या पंधरा वर्षांपासून पीडित महिलेचा पती व रमेश काकडे हे मित्र असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. उद्या काकडे यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.