जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्नी नांदायला येत नाही म्हणून रागातून कोयत्याने वार करून खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा न्यायालयाने मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी दोषी ठरविण्यात आले आहे. शिक्षेवर गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी कामकाज होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेडा तांडा येथे युवराज कपूरचंद जाधव हा आपल्या पत्नीसह वास्तव्याला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून युवराज जाधव व पत्नी कविता यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पत्नी कविता ही दोन मुलांसह माहेरी चाळीसगाव तालुक्यातील कारगांव तांडा येथे निघून गेल्या होत्या. पत्नी नांदायला येत नाही म्हणून याचा राग मनात धरून युवराज जाधव याने १६ जून २०२२ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तिच्या घरी आला. त्यावेळी त्याची पत्नी कविता ही दोन्ही मुलांसह गच्चीवर झोपलेले होते. संशयित आरोपी युवराज जाधव याने हातात कोयता घेऊन पत्नी कविता हिच्या छातीवर वार करून तिचा खून केला. यासंदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी युवराज कपूरचंद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. हा खटला जळगाव जिल्हा न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. यामध्ये मुलगा आणि मुलगी यांची साक्ष प्रत्यक्षदर्शी म्हणून महत्त्वाच्या ठरल्या. यामध्ये मुलगी मयुरी हिने घटना जशीच्या तशी सांगितल्याने संशयित आरोपी युवराज जाधव याला न्यायालयाने दोषी ठरविले. या शिक्षेवर सुनावणी गुरुवार २३ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आलेले आहे. सदर खटल्या सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी कामकाज पाहिले.